
श्री संकष्टादेवी मंदिर
नंदनगरीची ग्राम देवता

मंदिराचा इतिहास
श्री संकष्टा देवी मंदिर हे नंदुरबार मधील सर्वात पुरातन (माहित असलेला कालखंड १००० ते १२००वर्ष) संपूर्ण भारतात दोनच ठिकाणी आढळते, एक पुण्य क्षेत्र काशी (आनंदवन देवी स्तोत्र रत्नाकर पुस्तकातील उल्लेखा प्रमाणे) येथे व नंदनगरी येथे आहे. पुण्य क्षेत्र काशी येथील देवीस सुध्दा श्रीसंकटा (श्री संकष्टा संकटाचे हरण करणारी) असेच म्हणतात. श्री. संकष्टा देवी हे नाव विशिष्ट पध्द्तीच्या भौगोलिक रचने मुळे आहे. ते पुढील प्रमाणे श्री संकष्टा देवीच्या उत्तरेस विरेश्वर महादेव मंदीर व पूर्वेस चंद्रेश्वर महादेव मंदीर अशी रचना आहे. असेच काशीला आहे. (चंद्रेश्वर महादेव गणपती यांचे जवळील तसेच श्री विरेश्वर महादेव श्री मातेच्या मंदिरा जवळील छोटे देऊळ) आहे. स्वयंभू शंकराची देवळे असणे व मध्ये श्री देवीचे देऊळ असेलत्या देवीस श्री संकटा (संकष्टा) असे म्हणतात. वरील प्रमाणे स्थिती नंदुरबार व काशी या दोन्ही ठिकाणी सारखीच आहे. त्यामुळे दोन्ही देवींना श्रीसंकटा (श्रीसंकष्टा) नावाने संबोधतात.
नंदनगरी येथील श्रीसंकष्टा देवीला ग्रामदेवतेचे स्थान आहे. अजूनही नंदुरबार येथील जुना जाणता वर्ग दसऱ्याला सिमोल्लंघन करुन आल्यावर पहीला नमस्कार श्रीसंकष्टाईला केल्याशिवाय घरी जात नाही. श्री संकष्टाई ग्रामदेवता असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे नंदनगरीचे राजे नंद यांची ती कुळदेवता होती. म्हणूनच देवीचे मंदिर सुध्दा नंदराजाच्या गढीच्या काही अंतरावर व तथा त्या काळी नदी पलिकडे निसर्गरम्य ठिकाणी होते. श्री संकष्टादेवी स्वयंभू आहे. श्री देवीची मुर्ती चर्तुभूज आहे. एका हातात कमळ, एका हातात कमंडलू, एक हात अभयदान देणारा व एक भक्तांना आशिर्वाद देणारा आहे. श्रीसंकष्टादेवी अत्यंत जागृत असल्याने अनेक दाखले बघायला मिळतात. नवरात्रोत्सोवात श्री संकष्टादेवीची षोड्षोपचार पूजा बांधली जाते. रोज नविन दागिन्यांचा साज केला जातो. अष्टमीला श्रीदेवी वाघेश्वरीचे रुप घेते, त्या दिवशी देवीचे वाहन वाघ असते. तसेच दसऱ्याला महिषासुर मर्दिनीचा अवतार असतो. दसऱ्याला पुरणावरणाचा नैवेद्य श्रीमातेच्या चरणी अर्पण करतात.
पंचमीला देवी ललीता देवीचे रुप धारण करते, संपूर्ण वर्षात याएकाच दिवशी श्रीदेवीला चांदिचा मुखवटा चढवितात, मुखवटा बघण्यासाठी अनेक गावांचे लोक दर्शनास येतात. पंचमीला भाविक देवीस फुलोरा अपर्ण करतात. नवरात्रीचे नऊ दिवस मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. अष्टमीला नवचंडी होम होतो तसेच यादिवशी भावीक देवीस ५६ भोग अर्पण करतात. पंचमीला श्री मातेस १०८ तांबूल अर्पण करतात. नवरात्रीच्या पहील्या माळे पासून विविध भजनी मंडळे आपल्या सेवा आदिशक्तीच्या चरणी अर्पण करतात. नवरात्रीत रोज रात्रौ ९वा. मान्यवर तसेच माऊलींच्या भक्तांच्या हस्ते महाआरती, प्रसाद वाटप होते. दिपावली तसेच चैत्र नवरात्रात श्रीसंकष्टा देवीस नवरात्र प्रमाणे षोडषोपचार पुजा बांधली जाते त्याच प्रमाणे मंदिरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात. दिपावलीत मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात येतो. नवसाला पावणाऱ्या व भक्तांची दुःखे दुर करणाऱ्या श्री संकटाईचे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. मंदिराच्या ट्रस्ट कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. आपण देखील तन ,मन ,धनाचे या कार्यात सहभाग घेऊन धर्म कार्यात सहभागी होऊ शकतात. श्रीसंकष्टा देवीची पुजाअर्चा व व्यवस्थापन ब-हाणपूरकर कुटूंबीयांकडे पिढी जात चालत आलेली आहे व परंपरेचे पालन निष्ठा पूर्वक करत आहेत.




श्री संकष्टादेवी ट्रस्ट संचालित
१) शहिद शिरिषकुमार महेता वाचनालय, वृध्दींगत करणे.
२) दर रविवार सकाळी ९.०० ते ११.०० यावेळेत आयोजीत संस्कार वर्ग / तसेच डिजीटल क्लास रुप सुरु करणे.
३) श्री संकष्टाई मंदिराचे ट्रस्ट कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यालाअंतर्गत सुशोभिकरण इ. करीता देणगी देण्यास इच्छुक दात्यांना ट्रस्टच्या ८० जी सवलतीचा लाभ घेवुन आयकरा मध्ये सवलत मिळवता येईल व धर्मकार्याला हातभार लागेल. त्यासाठी मंदिराचे ट्रस्टचा बँक अकाऊंट-
नाव- श्री संकष्टादेवी ट्रस्ट, जळगांव जनता
सह.बँकनं. २३/५३३१ (IFSC CODE-JJSB0000013) चेक द्वारे/ रोख स्वरूपात / डि.डि. द्वारे देणगीची अधिकृत पावती देण्यात येईल.
संपर्क
श्री संकष्ट देवी मंदिर,
सोनार गल्ली,
रामदास व्यायाम शाळेसमोर,
नंदुरबार- 425412
+91 90281 51172.
